Posts

याज साठी केला होता अट्टहास( Balasaheb suregavkar and Pandhrinath kadam)

Image
 Marathi lyrics -  याजसाठी केला होता अट्‍टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

संत नामदेवांची अभंगगाथा भाग-10

 ‌‌‌‌‌                 * संत नामदेवांची पूर्वपीठीका * ११०. यदृशेटी शिंपी वैराग्याचा मेरू । विठूचा डिंगरू नरसी गावी।। पंढरीची वारी नित्य नेम करी । त्याचा पुत्र हरी विठ्ठलभक्त। हरीशेटीचा तो गोपाळ एकला । देवाचा भुकेला निशीदिनी। गोविंद राघव त्याचे दोन्ही सुत । पंढरीशी नेत गुढी आवडी।। सदभावे वंदावे पद गोविंदाचे । हरिनाम वाचे त्याचे गोड। जिवाजी धाकुला नरहरी थोरू। सुकृत सागरू पोटी आला।६। नरहरीचा तो पुत्र दामुशेटी । प्रेमभक्ती मोठी भाग्यवंत। ७॥ मस्तकी तयाची घ्यावी पायधुळी। प्रेमाचा कवळू त्याचे चित्त। ८। आउबाई आली दामुशेटी पोटी। भक्तीभावे मिठी घालू तिला।९। बहू दिन झाले पोटी नाही पुत्र। चिंता दिनरात्र उभयाशी ।१०। नवसिले देव सांडिली नरसी। आला पंढरीशी दामुशेटी। ११॥ वंध्यत्व पातले पुत्राविण देवा । वैकुंठीच्या राऊळा हासो आले । १२। आज्ञापिले देवे जावे तुवा उद्धवा । व्हावे नामदेव गोणाई पोटी।१३। जनीचा आनंद ओसंडे बाहेर । भक्तीचे माहेर आला नामा। १४।            * संत नामदेवांचे आत्मचरित्र (महाराष्ट्रातील) * १११...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग-9

             * संत नामदेवांची आर्त आळवणी * १०५. येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे। १ । सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणे केशिराजे। २ । नामा म्हणे तूं विश्वाची जननी। क्षिराब्धि निवासनी जगदंबे। ३ । १०६. येईं गे विठ्ठले अनाथाचे। माझे कुळदैवते पंढरीचे। १। पंचही प्राणांचा उजळोनि दीप। सुंदर श्रीमुख ओंवाळीन । २। मनाचा प्रसाद तुजलागीं केला। रंगभोग आपुला घेऊनि राहे। आनंदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्या नांवें।४। लें म्हणवावें सनाथ करावें । भावें संचरावें हृदयघटीं। ५ । नामा म्हणे माझे पुरवीं मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा । ६ । २०७. येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारी भवव्यथे पांडुरंगे। १ । मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळू । करी माझा सांभाळु पांडुरंगे। २ । तं माझें 4 माहेर नित्य आठवे अंतर । सखा विटेवर पांडुरंगा। ३ । मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्थि तूं अन्न । तृषार्थी तूं जीवन पांडुरंगा। ४ । मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा। ५ । मी धनलोभी शुभ तूं पूर्ण कनककुंभ । मी मगर तूं...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग-8

संध्येतील संकलीत नामावली १ १०३. केशव कैवल्य कृपाळ । नारायणे उद्धरिला अजामेळ। माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळीचा। १ । विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां । त्रिविक्रमें रक्षिले गोकुळा । वामने पाताळा बळी नेला। २। श्रीधरें धरा धरिली पृष्ठी। हृषिकेश उभा भीवरेतटी। पद्मनाभ पुंडलिकासाठी। दामोदरें गोष्टी पांडवांशी। ३ । संकर्षणे अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला। प्रद्युम्न समुद्रावरी कोपला। अनिरूद्ध छेदिला सहस्रबाहो। ४ । पुरुषोत्तमे केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ । नरहरी प्रल्हादा रक्षित। स्मरावा अच्युत स्वामी माझा। ५। जनार्दने रावणादि वधिले। उपेंद्रे अहिल्येसी उद्धरिले। हरिहरि म्हणतां दोष जळाले। कृष्णे तारिले गणिकेसी। ६ ।या चोवीस नामांचे करिता स्मरण । जन्ममरणांचे होय दहन। विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देईं। ७ । १०४. केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम।। माधव गोविंद सर्वशास्त्री आहे । उभारूनियां बाहे वेदुसांगे। २॥ नामाचेनि पाठे तरूं हा भवसागरू। आणिक विचारू नेणों आम्ही। ३ । विष्णु मधुसूदन हे...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 7

    संध्येतील चोवीस नामांनी भगवंतांची केलेली आळवणी संत नामदेवांना संध्या ज्ञात होती. ** ७९. येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दिनु माये। १। तूं माय जननी कांसवी कौसल्या। दिन बहुसाळ मज पावें । २ । न मागे केवळ विषयांचे टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठलमाय। ३। वोळली गगनी केशव कामधेनु । लवतां लोचन स्फुरे बाह्या । ४ । वाजवील वाद्य गोपाळांची मांदी। आल्हाद गोविंदी नित्य माझा। ५ । नामा म्हणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा। ६ । ८०. येई गे नारायणी अमृत संजीवनी । चिंतिता निर्वाणी पावें वेगीं। १ । तूं माझें जीवन नाम नारायण। नित्य अनुष्ठान तुझ्या नामें । २ । बाह्य अभ्यंतरी तूचि सर्वांठायी । तुजविण सृष्टी शून्य दिसे। ३ । चाल लवलाह्या कृपाळू तूं माये । मज हे न साहे मोह जंजाळ । ४ । तुटेल बिरडे सुटतील गांठी । जंव तूं जगजेठी येशील माये। ५ । नामा म्हणे धन्य तुझें नाम साचें। उच्चारितां वाचे निवती अंगे। ६ । ८१. येईं गे माधवे पाजी प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं । १। धांव तूं मधूकरे माधवे उदारे । येई तूं सोइरे जननिये । २ । कष्टलो मी भारी शीण दूर करी। येई तू झडकरी...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6

हरिपाठाचे अभंग ३९. नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्याभावें। न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे वक्त्रं श्रीरामनाम। धा अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत। ३। नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी। ४। ४०. जन्माचे कारण रामनाम पाठे। जाईजें वैकुंठे एक हेळां ।।। रामनामा ऐसां जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल अपैसा इहलोकीं। २। दो अक्षरी राम हा जप परम। नलगे तुज नेम नाना पंथ। ३। नामा म्हणे पवित्र श्रीरामाचें चरित्र । उद्धरसि गोत्र पूर्वजेंसी। ४ । ४१. विषयांचे कोड कां करिसी गोड। होईल तुज जोड इंद्रियबाधा।१। सर्व हे लटिके जाणुनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे। २। मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो। परि न धरिसी भावो भजनपंथे। ३ । नामा म्हणे देवा करी तूं लवलाहो । मयूराचा टाहो घन गर्जे। ४ । ४२. कांसवीचे दृष्टी जै होईजे भेटी । तै अमृताची वृष्टि घडे त्यासी। १। तैसें हे भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय।२। धन्य त्याचे कुळ सदां पै सुफळ । दिननिशी फळ रामनाम । ३। नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम । ४ । ४३. सदा फळ सु...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

वासुदेव बाबा अहंकार निशी घनदाट । गुरु वचनी फुटली पहाट। क्ति भेटली बरवंट। तिने मार्ग दाविला चोखट गा। १ । नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ।धृ० । एक बोल सुस्पष्ट बोलावा। वाचे हरि हरि म्हणावा। संत समागमु धरावा । तेणें ब्रह्मानंद होय आघवा गा। २ । आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झाले शरीरा । फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा।३। अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा। ४ । गौळण ३७. परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी। १ । म्हणती गौळणी हरीची पाउले धरा। रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा। २ । लपत छपत येतो हरी हा राजभुवनी। नंदासी ठाकूनी आपण बैसे सिंहासनी । ३ । सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी। ४ । बहुतां कष्टें बहुता पुण्ये जोडलें देवा। अनंत पवाडे तुमचे न कळती मावा। ५ । नामा म्हणे दातारा तुम्ही अहोजी केशवा। जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा । ६ । 'निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम' हे भजन म्हणावे. ३८. संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत...