संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5
वासुदेव
बाबा अहंकार निशी घनदाट । गुरु वचनी फुटली पहाट।
क्ति भेटली बरवंट। तिने मार्ग दाविला चोखट गा। १ ।
नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ।धृ० ।
एक बोल सुस्पष्ट बोलावा। वाचे हरि हरि म्हणावा।
संत समागमु धरावा । तेणें ब्रह्मानंद होय आघवा गा। २ ।
आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झाले शरीरा ।
फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा।३।
अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ ।
अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा। ४ ।
गौळण
३७. परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी। १ ।
म्हणती गौळणी हरीची पाउले धरा। रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा। २ ।
लपत छपत येतो हरी हा राजभुवनी। नंदासी ठाकूनी आपण बैसे सिंहासनी । ३ ।
सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी। ४ ।
बहुतां कष्टें बहुता पुण्ये जोडलें देवा। अनंत पवाडे तुमचे न कळती मावा। ५ ।
नामा म्हणे दातारा तुम्ही अहोजी केशवा। जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा । ६ ।
'निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम' हे भजन म्हणावे.
३८. संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत। १ ।
तेथे असे देव उभा। जैशी समचरणांची शोभा। २ ।
रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत । ३ ।
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा जो जिव्हार। ४ ।
ऐशा संतां शरण जावें। जनी म्हणे त्याला ध्यावें। ५।
हा अभंग म्हणून जय विठ्ठल जय जय विठ्ठल भजन म्हणावे.

Comments
Post a Comment