संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4
* भूपाळी व काकड आरतीचे अभंग
२७. उठाउठा प्रभात जाहली। चिंता श्रीविठ्ठल माऊली।
दीन जनांची साउली । येई धाउनि स्मरतांचि।१।।
पंढरपुरी जे भिमातटीं। सुंदर मनोहर गोमटी।
दोन्ही कर ठेवोनियां कटी। भेटीसाठी तिष्ठतसे। २।।
किरीट कुंडले मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत।
गळां वैजयंती डुलत । हार मिरवत तुळसीचा। ३।
सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठी कौस्तुभ एकावळी।
केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळी विलसतसे। ४ ।
पीत पीतांबर कसला कटी। अक्षयी वीट चरण तळवटी।
सकळ सौंदर्य सुखाची पेटी। हृदय संपुष्टी आठवा तें। ५ ।अति प्रिय आवडे तुळसी बुका। तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका।
नामा पदपंकज पादुका। शिरी मस्तकीं वंदितसे ।।
२८. उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा।
भावें चरणी ठेवा माथा। चुकवा व्यथा जन्माच्या।।
धन दारा पुत्रजन। बंधु सोयरे पिशुन।
सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी।।
मायाविघ्ने भ्रमलां खरे । म्हणतां मी माझेनि घरें।
हे तो संपत्तीचे वारें । साचोकारें जाईल। ३।
आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा।
'स्वहिताचा घोर वहा । ध्यानी रहा श्रीहरीच्या। ४।
संत चरणी भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा।
मुक्ति सायोज्यता वरा । हेंचि करा बापांनों। ५।
विष्णुदास विनवी नामा । भुलू नका भवकामा।
'धरा अंतरी निज प्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति । ६।
२९. उठा उठा साधुसंत। साधा आपुलें हित।
गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत । ध्रु ।
उठोनिया वेगेशीं। चला जाऊं राउळाशी।
जळती पातकाच्या राशी। काकड आरती देखिलिया।१।
उठोनियां
पहाटे। विठ्ठल पहा उभा विटे।
चरण तयाचे गोमटे । अमृत दृष्टि अवलोका। २ ।
जागे करा रुक्मिणीवरा। देव आहे निदसुरा ।
वेर्ग निंबलोण करा। दष्ट होईल तयासी।३।
पुढे वाजंत्रे वाजती। ढोल दमामे गर्जती।।
काकड आरती। पांडुरंगरायाची ।४।

सिंहनाद शंख भेरी। गजर होतो महाद्वारी।
केशवराज विटेवरी। नामा चरण वंदितो। ५।
30. उठा अरुणोदय प्रकाश जाहला । घंटा गजर गर्जिनला।
हरि चौघडा सुरू झाला । काकड आरती समयाचा। १ ।
महाद्वारी वैष्णव जन । पुजा सामुग्री घेऊन।।
आले द्या तयासी दर्शन। बंदीजन ग र्जती ।२।
सभामंडपी कीर्तन घोष। मृदंग टाळ विणे सुरस ।।
आनंदे गाती हरीचे दास । परम उल्हास करुनियां। ३ ।
चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जन दाटी ।
आतां येतील आपुले भेटी । उठा उठा गोविंदा । ४ ।
ऐसें विनवी रुक्मिणी। जागृत जाहाले चक्रपाणि।
नामा बद्धांजुळी जोडुनी । चरणीं माथा ठेवितसे । ५।
३१. पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी।।
उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ।१॥
देवा शकून ऐकावा । ध्रु०।
संत साधु अपरिमित । अवघा भरियेला थाट ।
टाळ वीणे वाद्य वाजत। आवडी मंजुळ स्वरें गात । २ ।
नादें अंबर दणाणलें। तेहतीस कोटी देव मिळाले ।
आवडी पहावया आले । स्वर्गसुखातें विसरले । ३ ।
आई रखुमाई माते। उठवा उठवा श्रीरंगातें ।
नारद तुंबर गायनाते। कर जोडुनि हनुमंत । ४ ।।
उठिला सांवळा वनमाळी। आनंदली भक्तमंडळी।।
जयजयकारें पिटिली टाळी। विठ्ठल नामें दिधली आरोळी। ५ ।
पिंगळा आनंदला मनीं । तेज न माये गगनीं ।
हर्षे घातली लोळणी । शिंपी नामा तुझे चरणीं । ६ ।
३२. उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला। वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला।
वाळवंटापासुनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडुनि हात । २१
शकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडुनि पाहाताती जगजेठी। ३ ।
सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ । ४१
रंभादिक नाचती उभ्या जोडुनि हात । त्रिशूळ डमरु घेउनि आला गिरिजेचा कांत । ५।
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती । भावे ओवाळिती राही रखुमाईचा पती।६।
अनंत अवतार घेसी भक्तांकारणे । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें। ७ ।
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी । पाठमागे डोळे लावुनि उभी ते जनी। ८ ।
३३. उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा। १।
संत साधु मुनि अवघे झालेती गोळा। सोडा शेजेसुख आतां पाहूं द्या मुखकमळा । २।
रंगमंडपी महाद्वारी झालीसें दाटी। मन उतावेळ रुप पहावया दृष्टी। ३।
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया। शेजें हालउनी जागे करा देवराया। ४ ।
गरुड हनुमंत उभे पहाती वाट। स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट । ५ ।
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा। ६ ।
३४. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्रगदापद्मसहित हरी। १ ।
देखिला देखिला देवाआदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे ग माये। २ ।
सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती। वंदुनि चरणरज नामा विनवीतसे पुढती । ३ ।
या अभंगानंतर आरती म्हणावी.
३५. लाजलें गे माय आतां कवणा ओवाळु । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळु। १ ।
ओवाळू मी गेंले माय गेले द्वारके। जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिखे। २।
ओवाळू मी गेले माय सखिया माझारी। जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी। ३ ।
ओवाळू मी गेले माय सारंगधरा । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा । ४ ।
श्रीवत्सलांच्छन आता हीच ओळखण। विष्णुदास नामा येणे दावियेली खूण । ५ ।
- आरतीनंतर वासुदेव व गौळण म्हणावी.
Ram krushna hari
ReplyDelete