संत नामदेवांची अभंगगाथा भाग-9

             * संत नामदेवांची आर्त आळवणी *
१०५. येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे। १ ।
सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणे केशिराजे। २ ।
नामा म्हणे तूं विश्वाची जननी। क्षिराब्धि निवासनी जगदंबे। ३ ।
१०६. येईं गे विठ्ठले अनाथाचे। माझे कुळदैवते पंढरीचे। १।
पंचही प्राणांचा उजळोनि दीप। सुंदर श्रीमुख ओंवाळीन । २।
मनाचा प्रसाद तुजलागीं केला। रंगभोग आपुला घेऊनि राहे।
आनंदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्या नांवें।४।
लें म्हणवावें सनाथ करावें । भावें संचरावें हृदयघटीं। ५ ।
नामा म्हणे माझे पुरवीं मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा । ६ ।
२०७. येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारी भवव्यथे पांडुरंगे। १ ।
मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळू । करी माझा सांभाळु पांडुरंगे। २ ।
तं माझें 4 माहेर नित्य आठवे अंतर । सखा विटेवर पांडुरंगा। ३ ।
मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्थि तूं अन्न । तृषार्थी तूं जीवन पांडुरंगा। ४ ।
मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा। ५ ।
मी धनलोभी शुभ तूं पूर्ण कनककुंभ । मी मगर तूं अंभ पांडुरंगा।६।
मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध। मी शुष्कनदी तूं ओघ पांडुरंगा। ७ ।
मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक । मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा। ८ ।
मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी। मी अपत्य तूं जननी पांडुरंगा। ९ ।
मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ।१०।
ऐसी जे जे माझी विनंती ते तुजचि लक्ष्मीपती। नित्य सुखी सांगाती पांडुरंगा।११।
शीघ्र येईं वो श्रीरंगे भक्त मानस रंगे । प्रेमपान्हा देगे नामदेवा । १२ ।
१०८. येई बा विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरी काढी मज। १ ।
आकांता अवसरी स्मरलासे गजेंद्रे । दीनानाथ बिदें साच केलीं। २।
द्रौपदी संकटीं स्मरलीसे वनवासीं। धांवोनि आलीसि लवडसवडी। ३ ।
प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें। ४ ।
नामा म्हणे थोर पीडिलों गर्भवासें । अखंड पाहतुसें वाट तुझी। ५ ।
१०९. येईवो विठ्ठले माझे माऊली ये। निढळावरी कर ठेऊनि वाट पाहे। धृ० ।
येतिया पुसे जातिया धाडी निरोप । पंढरपुरी आहे आमुचा मायबाप। १ ।
पितांबराची कांस शेला गगनी झळकला । गरूडावरी बैसोनि आमुचा कैवारी आला। २ ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिवाळी। विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी। ३ ।

Comments

Popular posts from this blog

संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6