संत नामदेवांची अभंगगाथा भाग-10

 ‌‌‌‌‌                 * संत नामदेवांची पूर्वपीठीका *
११०. यदृशेटी शिंपी वैराग्याचा मेरू । विठूचा डिंगरू नरसी गावी।।
पंढरीची वारी नित्य नेम करी । त्याचा पुत्र हरी विठ्ठलभक्त।
हरीशेटीचा तो गोपाळ एकला । देवाचा भुकेला निशीदिनी।
गोविंद राघव त्याचे दोन्ही सुत । पंढरीशी नेत गुढी आवडी।।
सदभावे वंदावे पद गोविंदाचे । हरिनाम वाचे त्याचे गोड।
जिवाजी धाकुला नरहरी थोरू। सुकृत सागरू पोटी आला।६।
नरहरीचा तो पुत्र दामुशेटी । प्रेमभक्ती मोठी भाग्यवंत। ७॥
मस्तकी तयाची घ्यावी पायधुळी। प्रेमाचा कवळू त्याचे चित्त। ८।
आउबाई आली दामुशेटी पोटी। भक्तीभावे मिठी घालू तिला।९।
बहू दिन झाले पोटी नाही पुत्र। चिंता दिनरात्र उभयाशी ।१०।
नवसिले देव सांडिली नरसी। आला पंढरीशी दामुशेटी। ११॥
वंध्यत्व पातले पुत्राविण देवा । वैकुंठीच्या राऊळा हासो आले । १२।
आज्ञापिले देवे जावे तुवा उद्धवा । व्हावे नामदेव गोणाई पोटी।१३।
जनीचा आनंद ओसंडे बाहेर । भक्तीचे माहेर आला नामा। १४।
           * संत नामदेवांचे आत्मचरित्र (महाराष्ट्रातील) *
१११. कल्याणींचा शिंपी हरिभक्त गोमा । त्यांची कांता उमा नरहरि भजनीं। १।
सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न । झाली संबोधन गोणाबाई। २।
गोणाई दामासेठी झाले पाणिग्रहण । संसारी असोन नरसी गांवीं। ३ ।
गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज । गाधिज भारद्वाज दोनी कुळें। ४ ।
आऊबाई कन्या झाली गोणाईसी। पुढे देवा नवसी पुत्रासाठीं । ५ ।
नामा म्हणे होतें विठोबाचे मनीं । तेंचि नित्य जननी नवस करी । ६ ।
११. गोणाईने नवस केला। देवा पुत्र देईं मला।१।
पत्र देंई भक्त । ज्याला आवडे पंढरीनाथ । २ ।
शद्ध देखोनियां भाव । पोटा आले नामदेव। ३ ।
दामाशेटी हरुषला । दासी जनीने ओवाळिला । ४ ।
११३. लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा। १ ।
आदि ठाणे पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर। २ ।
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला। ३ ।
शद्ध देखोनियां भाव । पोटा आले नामदेव । ४ ।
दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला। ५ ।
११४. नामदेव पुत्र झाला। विठो बारशासी आला। १ ।
आंगडे टोपडे पेहरण । शेला मुंडासा घेऊन। २।
माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा। ३।
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवू सांगा। ४ ।
११५. माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिले त्याची खूण सारू ऐका।१।
अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवतां आदित्य रोहिणीसीं। २।
शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रमोद संवत्सर शालिवाहन शके। ३ ।
प्रसवली माता मज मळमूत्रीं । तेव्हां जिव्हेवरी लिहीलें देवें। ४ ।
शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे। ५ ।
ऐंशी वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण। नामसंकीर्तने नामया वृद्धि। ६ ।
११६. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं। १ ।
रात्रिमाजि शिवी दिवसामाजि शिवीं । आराणुक जीवीं नाहीं माझ्या। २।
सुई आणि सातुळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं। ३ ।
नामा म्हणे शिवीं विठोबाची अंगी । त्याचेनि मी जगीं धन्य झालो। ४ ।

Comments

Popular posts from this blog

संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6