संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 7
संध्येतील चोवीस नामांनी भगवंतांची केलेली आळवणी
संत नामदेवांना संध्या ज्ञात होती. **
७९. येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दिनु माये। १।
तूं माय जननी कांसवी कौसल्या। दिन बहुसाळ मज पावें । २ ।
न मागे केवळ विषयांचे टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठलमाय। ३।
वोळली गगनी केशव कामधेनु । लवतां लोचन स्फुरे बाह्या । ४ ।
वाजवील वाद्य गोपाळांची मांदी। आल्हाद गोविंदी नित्य माझा। ५ ।
नामा म्हणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा। ६ ।
८०. येई गे नारायणी अमृत संजीवनी । चिंतिता निर्वाणी पावें वेगीं। १ ।
तूं माझें जीवन नाम नारायण। नित्य अनुष्ठान तुझ्या नामें । २ ।
बाह्य अभ्यंतरी तूचि सर्वांठायी । तुजविण सृष्टी शून्य दिसे। ३ ।
चाल लवलाह्या कृपाळू तूं माये । मज हे न साहे मोह जंजाळ । ४ ।
तुटेल बिरडे सुटतील गांठी । जंव तूं जगजेठी येशील माये। ५ ।
नामा म्हणे धन्य तुझें नाम साचें। उच्चारितां वाचे निवती अंगे। ६ ।
८१. येईं गे माधवे पाजी प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं । १।
धांव तूं मधूकरे माधवे उदारे । येई तूं सोइरे जननिये । २ ।
कष्टलो मी भारी शीण दूर करी। येई तू झडकरी माधवे वो। ३।
अनंत वो नामें पुराणे पढती। पावसी आकांती विठ्ठले वो। ४ ।
नामा म्हणे लाहो करावा माधवे। माझेनि वो जीवें लाहे चाड। ५ ।

८२. येई तूं गोविंदे नामामृत धारी। नित्य हे उच्चारी गोविंदाते।।
गोविंद गोविंद नित्य हाचि छंद। पावें तूं हृद्गद आदिरूपें।।
गोविंद हो ध्याने निवती अष्टांगे। गोविंदे गे वेगें वेष धरूं ।।।
गोविंद गोपाळ मुकुंद केसरी । येई तूं लवकरी सांवळिये।४।
गोविंद हे नाम जनी वनी दिसे । प्रत्यक्ष तें ठसे पंढरीसी।।
वेणूनादी काला गोविंदे पै केला । धावतचि आला पेंद्यापाशी। ६।
ती हीच वो माय उभी बाळमूर्ती । नाम जे जपती पांडुरंग । ७।
नामा म्हणे पांग गोविंद हा दवडी । वेगें लवडसवडी करी माये। ८ ।
८३. येई तूं विष्णू हरि पावे लवकरी । ब्रीद चराचरी सांगे मुनी। १ ।
वैकुंठवासिनी कृष्णविष्णुदेव । नामातें गौरव आम्हालागीं । २ ।
धन्य हाचि दिनु विष्णुमाय पावे । गगनी उगवे सूर्य जैसा । ३ ।
आदि ब्रह्मा हरि विष्णुकृष्णगंगा। भागिरथी पैं गा पदी पावे । ४ ।
गया तें प्रयाग काशी ते सर्वांग। विश्वेश्वर लिंग चराचर। ५ ।
विष्णुगंगाधर विष्णुनाम पाठ। उच्चारितां वाट वैकुंठीची। ६ ।
नामा म्हणे विष्णु भागिरथीमाजी। पंढरीये माझी विठ्ठलमाय। ७ ।
८४. येईं तूं मधुकरे मदनसुंदरे। मज गे न धरे प्रेम पोटी। १ ।
तूं माझी जननी मधुसूदन गाय। कामधेनु होय कांसवीची। २ ।
आनंद निजधने जुनाट मधुसूदने । शुकस्तनपान पाजी पान्हा । ३ ।
'केशव कांसवी पद रामगाय। आत्माराम होय नि:संदेह । ४ ।
विठ्ठलमुकुंदे स्वरूपे गोमटी। आकांतली सृष्टी मधुसुदर्ने । ५।
'शंखचक्रांकित आयुधे मंडीत । मुकुट शोभत तुझा शिरी ।६।
भक्तवरदायनी मधुसूदनगंगा। व्हावे तु वो वेगा कामधनु ।७।
नामा म्हणे माय मधुसुदन गाय । ते संजीवनी होय आम्हांलागी।८।
८५. येई वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं। कामधेनु होईं विठ्ठलराजे। १।
त्रिविक्रमे धरे येई तूं सांवळे। मुकुंद गोपाळे केशवे वेगी। २ ।
त माझे निजधन त्रिविक्रमधरे । गंगानाममात्र भंगी पाप । ३।
त्रिपदागायत्री त्रिविक्रममुखें । जनाची वो दुःखे हरती नामें। ४ ।
त्रिजया त्रिफणी भागीरथी वेणी । प्रयाग वो धुनी पाप जाळी । ५ ।
त्रिस्थळी त्रिमाये त्रिविक्रम होय । विश्वेश्वर दोहे तारक ब्रह्म। ६ ।
काशी कांची माये अयोध्या द्वारका । मथुरा अवंतिका तूंचि माये । ७ ।
नामा म्हणे माझी त्रिविक्रम गाय । भक्तिसी पान्हाये पंढरपुरीं । ८।
८६. येई वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें । १ ।
येई वो डोळसे सांवळे तेजसे। वामने बहु वसे ब्रह्मचारी । २ ।
अनंत विद्गदे अनंत अपार । कैवल्य वोसरे पदकमळे। ३ ।
तुझे नाम धन्य वामन साजिरें । रुप हे गोजिरें बळीच्या द्वारी । ४ ।
तुझ्या चरणी तीर्थे उद्धरती सर्व । येईं तू सत्वर वामनाई । ५।
नामा म्हणे पावे वामन ब्रह्मांडे । स्वरूप वितंडे ब्रह्मचारें। ६।
८७. येई वो श्रीधरे सर्व रूपसारे। कैवल्य उत्तरे अभिनव। १ ।
श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे। प्रगट वो सांगे पूर्णधन। २।
श्रीकरे श्रीधरे शोभा ते साचारे। चक्रांकित करे शंख तुझा। ३ ।
सुंदर श्यामळ नाम हे अढळ । मुखी हो वेल्हाळ हस्त तुझे। ४ ।
प्रकाशे हा पूर्ण श्रीधरे पैं जाण। सांगितली खूण खेचराने। ५ ।
नामा म्हणे माता श्रीधर उच्चारू । तरेन साचारू तिन्ही लोकीं। ६।
८८. येईं हृषिकेशी दिव्यरूप दिसे। मन हे उल्हासे भेटीलागी।१।
हृषिकेशी नामें तरले संभ्रमे। नित्य रामनामें भवसिंधू । २ ।
आराधने धन ऋषीसी संपूर्ण। नाम कोटी यज्ञ झाले तया। ३ ।
पावन हृषिकेशी हेंचि ध्यान मन । नाम सनातन हृषिकेशी। ४ ।

विश्वा करी कळा विश्वजन लीळा । त्राहे वेळोवेळां हृषीकेशी।
नामा म्हणे माय येई हृषिकेश । झालों कासावीस तुजवीण। ६।
८९. येई वो पद्मनाभे पंकजलोचने । विश्व पूर्णघने देखे तुज । १।
त्राहें पद्मनाभा वाचा सिद्ध पावे । मज हे नुगवे मायाजाळ । २॥
पद्मांकित रेखा पद्म हे सुरेख । पावे वो निमिष्य एकमाये । ३।
विचरे हे पृथ्वी नाम पद्मनाभ । स्वयंभावो बिंब विठ्ठलेसी । ४।
रिकामी मी नसें दिननिशी निमिष्य । पद्मनाभ साक्ष हृदयी भोगी।५।
नामा म्हणे पद्मनाभ हे हो नाम । जपतुसे प्रेम देई मज। ६।
९०. येई वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट। १।
पाहें कृपादृष्टी साहे जगजेठी। पूर्ण पान्हा घोटी ऐसें करी। २।
दामोदरे नाम मदन परिकरे । हाचि वो विचार मनें केला। ३।
येईं तूं निर्धार पावें तूं झडकरी। येईं वो लवकरी दामोदरे। ४ ।
दामोदर माता पाहे वो समता । पावे वो निवांता पावे वेगीं। ५ ।
नामा म्हणे लोटू प्रेमामृत निवडूं । नामेंचि वैकुंठे दामोदरे । ६ ।
९१. येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुणनिधि । १।
त्राहेत्राहे वेगी पावे वो झडकरी। ब्रीद चराचरी वर्णिताती । २ ।
संकर्षण गंगा सर्वांगी तूं असे । जनी वनी दिसें रूप तुझे। ३।
निर्धारु सांगतां न माये वो घेता। संकर्षण माता पाव वेगी। ४ ।
विष्णुसंकर्षण नाम हे गहन। पतितपावन चरणरजें। ५।
नामा म्हणे माय संकर्षण गाय। हरिदासा पान्हावे पंढरीसी। ६ ।
९२. येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवे सारे गोपाळे वो। १।
त्राहे वासुदेवा पावें झडकरी। त्वरें वेगू करी आर्त भेटी । २ ।
वासुदेवनामें साधन सुगम । योगिया विश्राम स्थान झालें। ३ ।
द्वादश अक्षर जपिन्नला धुरु। तयासी साचारू अढळपद । ४ ।
बळी भीष्मदेवी वासुदेवी भाव । रोहिणीची माव ऐसे झालें। ५ ।
नामा म्हणे भक्त वासुदेवीं रत। सायुज्य पावे तो एक्यानामें। ६ ।
२३. येई तूं प्रद्युम्ने ध्यान तूं धरणे। माझिये कल्पने निर्धारुसा। १।
वाहे झडकरी पावे वो लवकरी । प्रद्युम्ने फुत्कारी वेळोवेळां। २ ।
सांवळे सुंदरे वेणु वाहे करे। ध्यान हे सुंदर यमुनातटी। ३ ।
प्रवाह प्रद्युम्ने नामघोष दाट । जिंकिले जुनाट पापराशी। ४ ।
नामा म्हणे नाम धन्य हे प्रद्युम्न। होईल संपन्न नाम घेतां । ५ ।
१४. येई वो अनिरूद्धे सांवळे प्रबुद्धे । विराटे गोविंदे पाव वेगीं। १ ।
त्राहे माउलीये मना तुझी सोय। चुकती अपाय नाम घेता। २ ।
अनिरुद्ध पाठे जाईन वैकुंठे। पुंडलीक पेठे उभा असे। ३ ।
कटावरी कर सांवळी सुंदर। मनाचा विचार इच्या चरणी। ४ ।
अनिरुद्धसार अनु नाही आधार । सर्वही विचार अनिरुद्धे । ५ ।
नामा म्हणे येई अनिरुद्धे माये । आणिक उपाय न लगे मज। ६ ।
९५. येई तूं पुरुषोत्तमे संजीवनी रामे । योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा। १ ।
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम। साधन आगम ऐसी माये। २ ।
येई वो सांभाळी लवलाहे मने । जुनाट हो जुने पुरुषोत्तमें। ३ ।
तुझे नाम धन्य पुरुष हे सौजन्य। द्वैत हे अभिन्न अद्वैत हैं। ४ ।
एकाक्षरी नाम पुरुष शुचिसम। नाम आत्माराम पुरुषोत्तम। ५ ।
नामा म्हणे पावें पुरुषोत्तम माते। सर्वत्र अद्वैत एकरुप। ६।
९६. येईं वो अधोक्षजे वैकुंठ विराजे । नाम गे सहजे अमृतरासी। १।
अधोक्षज नामें घालीन गोंधळ । रिता एक पळ जाऊं नेदी। २ ।
अधर हे रंगी अधोर्ध्व सेवीन । सर्वत्र पाहीन अधोक्षज। ३ ।
अरिष्ट हे निरसी माये अधोक्षजे। ऐसी या पाविजे संकटी त्वां। ४ ।
अरि हे मर्दन अधोक्षज जाणे । स्वीकारावे पूर्ण प्रगटतां । ५ ।
नामा म्हणे धांवे अधोक्षज पावे । दिशाद्रुम भावें तुज मग । ६।
९७. येईं वो केसरी नरसिंह उच्चारी। पवित्र साचारी तिही लोकी।
नरसिंह वामन प्रल्हाद रक्षण। आमुचें तें धन नाम तुझें।
शंखचक्र करी पावे वो लवकरी । येईं तूं केसरी लवलाहे। ३१
नरसिंह हें नाम नरसिंह हे प्रेम । उत्तमोत्तम तिन्ही लोकीं।४
त्रिपररक्षक दानवमर्दन । विकटवदन पंचाक्षरी।५।
नामा म्हणे हरि नाम नरकेसरी । नरसिंह उच्चारी तरती जीव । ६।
९८. येई वो अच्युते नामामृत रसे। सुंदर डोळसे जान्हवीये। १।
अमृताची खोटी अच्युतनाम पेठी। पावे वो जगजेठी अच्युतसार। २।
अच्युत अच्युत नामें हेंचि सत्य। हे पियूष त्वरित उच्चारितां। ३ ।
वैकुंठीची मूर्ति अच्युतनाम पाठे। प्रत्यक्ष वो भेटे विटेवरी । ४।
पुंडलीक दृष्टी नयनाची भेटी। निवारितां दृष्टी न्याहाळितां। ५।
नामा म्हणे अच्युत नाम हेंचि आम्हा । दिननिशी राम जपतसें। ६।
९९. येई जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्घने पांडुरंगे। १।
त्राहे जनार्दने पूर्णानंदघने। येई वो संपन्ने विश्वंभरे। २।
नाम हे दुर्लभ जनकजननी । राम जनार्दनी विनटली। ३ ।
सांवळी डोळस रवि एकासनी । तेज प्रकाशनी हिरियाची। ४ ।
जननी ते जननी निकट ते जीवनी । जग प्रगटिणी हरीयाची। ५।
नामा म्हणे जन नाम जनार्दन । सनकादिक जाण सेविताती। ६ ।
१००. येईं तूं उपेंद्रे विठ्ठल महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनी। १।
त्राहे वो जननी शिणलों गे माये। तुजविण आहे कवण मज । २।
तूं माझे कारुण्य प्रत्यक्ष सौजन्य । विचारतां प्रवीण प्रबुद्ध हो। ३ ।
पावे वो तूं वेगी उपेंद्रे गे माते । पुंडलिक सांगाते पंढरीसी। ४ ।
दीपकु लाविला दिन उगवला। दीप फळला पांडुरंग। ५।
नामा म्हणे नाम उपेंद्र ऐसे शम । पावेन विश्राम नाम घेता। ६ ।
१०१. येई तूं हरीरूपे विठ्ठल स्वरूपे । कळिकाळ कांपे नाम घेतां। १।
नामें हरिहरि त्राहे वो झडकरी । शिणलों मी भारी जननीये । २ ।
हरिनामधन सर्व जनार्दन । हरी हे आठवण जिव्हेसदा। ३।
हरीहरी म्हणतां हरीरुप संता। नाम हे अनंताक्षर विलसे। ४ ।
येईं तूं हरी गंगे सांवळे सुरंगे। हरीहरी संगे रतलोंसे। ५।
नामा म्हणे हरी पांडुरंग माझा। चरण हो भोजा राज्य धरू। ६।
१०२. येई वो तूं कृष्णे हरी माझिये तृष्णे । दिननिशी प्रष्णे वाट पाहें। १ ।
त्राहे कृष्णगंगे सांवळे सारंगे। नामस्मरण वेगें पुरे आम्हा। २ ।
रामकृष्ण टाहो नामें लवलाहो। फिटला संदेहो संसाराचा। ३ ।
उद्धव अक्रूर यादव सादर । कृष्णाते अपार तयालागी। ४ ।
अर्जुन द्रौपदी स्मरण गोविंदीं। पावावे निजपदी नामा म्हणे। ५ ।
संध्येतील नामावली समाप्त.
Comments
Post a Comment