Posts

Showing posts from November, 2019

संत नामदेवांची अभंगगाथा भाग-9

             * संत नामदेवांची आर्त आळवणी * १०५. येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे। १ । सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणे केशिराजे। २ । नामा म्हणे तूं विश्वाची जननी। क्षिराब्धि निवासनी जगदंबे। ३ । १०६. येईं गे विठ्ठले अनाथाचे। माझे कुळदैवते पंढरीचे। १। पंचही प्राणांचा उजळोनि दीप। सुंदर श्रीमुख ओंवाळीन । २। मनाचा प्रसाद तुजलागीं केला। रंगभोग आपुला घेऊनि राहे। आनंदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्या नांवें।४। लें म्हणवावें सनाथ करावें । भावें संचरावें हृदयघटीं। ५ । नामा म्हणे माझे पुरवीं मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा । ६ । २०७. येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारी भवव्यथे पांडुरंगे। १ । मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळू । करी माझा सांभाळु पांडुरंगे। २ । तं माझें 4 माहेर नित्य आठवे अंतर । सखा विटेवर पांडुरंगा। ३ । मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्थि तूं अन्न । तृषार्थी तूं जीवन पांडुरंगा। ४ । मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा। ५ । मी धनलोभी शुभ तूं पूर्ण कनककुंभ । मी मगर तूं...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग-8

संध्येतील संकलीत नामावली १ १०३. केशव कैवल्य कृपाळ । नारायणे उद्धरिला अजामेळ। माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळीचा। १ । विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां । त्रिविक्रमें रक्षिले गोकुळा । वामने पाताळा बळी नेला। २। श्रीधरें धरा धरिली पृष्ठी। हृषिकेश उभा भीवरेतटी। पद्मनाभ पुंडलिकासाठी। दामोदरें गोष्टी पांडवांशी। ३ । संकर्षणे अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला। प्रद्युम्न समुद्रावरी कोपला। अनिरूद्ध छेदिला सहस्रबाहो। ४ । पुरुषोत्तमे केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ । नरहरी प्रल्हादा रक्षित। स्मरावा अच्युत स्वामी माझा। ५। जनार्दने रावणादि वधिले। उपेंद्रे अहिल्येसी उद्धरिले। हरिहरि म्हणतां दोष जळाले। कृष्णे तारिले गणिकेसी। ६ ।या चोवीस नामांचे करिता स्मरण । जन्ममरणांचे होय दहन। विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देईं। ७ । १०४. केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम।। माधव गोविंद सर्वशास्त्री आहे । उभारूनियां बाहे वेदुसांगे। २॥ नामाचेनि पाठे तरूं हा भवसागरू। आणिक विचारू नेणों आम्ही। ३ । विष्णु मधुसूदन हे...

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 7

    संध्येतील चोवीस नामांनी भगवंतांची केलेली आळवणी संत नामदेवांना संध्या ज्ञात होती. ** ७९. येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दिनु माये। १। तूं माय जननी कांसवी कौसल्या। दिन बहुसाळ मज पावें । २ । न मागे केवळ विषयांचे टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठलमाय। ३। वोळली गगनी केशव कामधेनु । लवतां लोचन स्फुरे बाह्या । ४ । वाजवील वाद्य गोपाळांची मांदी। आल्हाद गोविंदी नित्य माझा। ५ । नामा म्हणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा। ६ । ८०. येई गे नारायणी अमृत संजीवनी । चिंतिता निर्वाणी पावें वेगीं। १ । तूं माझें जीवन नाम नारायण। नित्य अनुष्ठान तुझ्या नामें । २ । बाह्य अभ्यंतरी तूचि सर्वांठायी । तुजविण सृष्टी शून्य दिसे। ३ । चाल लवलाह्या कृपाळू तूं माये । मज हे न साहे मोह जंजाळ । ४ । तुटेल बिरडे सुटतील गांठी । जंव तूं जगजेठी येशील माये। ५ । नामा म्हणे धन्य तुझें नाम साचें। उच्चारितां वाचे निवती अंगे। ६ । ८१. येईं गे माधवे पाजी प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं । १। धांव तूं मधूकरे माधवे उदारे । येई तूं सोइरे जननिये । २ । कष्टलो मी भारी शीण दूर करी। येई तू झडकरी...