संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6
हरिपाठाचे अभंग
३९. नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्याभावें।
न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे वक्त्रं श्रीरामनाम। धा
अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत। ३।
नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी। ४।
४०. जन्माचे कारण रामनाम पाठे। जाईजें वैकुंठे एक हेळां ।।।
रामनामा ऐसां जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल अपैसा इहलोकीं। २।
दो अक्षरी राम हा जप परम। नलगे तुज नेम नाना पंथ। ३।
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचें चरित्र । उद्धरसि गोत्र पूर्वजेंसी। ४ ।
४१. विषयांचे कोड कां करिसी गोड। होईल तुज जोड इंद्रियबाधा।१।
सर्व हे लटिके जाणुनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे। २।
मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो। परि न धरिसी भावो भजनपंथे। ३ ।
नामा म्हणे देवा करी तूं लवलाहो । मयूराचा टाहो घन गर्जे। ४ ।
४२. कांसवीचे दृष्टी जै होईजे भेटी । तै अमृताची वृष्टि घडे त्यासी। १।
तैसें हे भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय।२।
धन्य त्याचे कुळ सदां पै सुफळ । दिननिशी फळ रामनाम । ३।
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम । ४ ।
४३. सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदि कळिकाळ शास्त्र सांगे। १।
ब्रह्मांडनायक ऐंसे जें कवतुक । तेचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें। २ ।
आदी अंत पाहतां नाही पै सर्वथा। परिपूर्ण सरीता अमृताची। ३ ।
नामा म्हणे अनंत कां करीसी संकेत। उद्धरिले पतीत युगायुगीं। ४ ।
हरीपाठाचे प्रत्येक अभंगानंतर 'न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे। वणिज वक्त्र
श्रीरामनाम' हे धृपद म्हणावे.
३९. नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्याभावें।
न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे वक्त्रं श्रीरामनाम। धा
अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत। ३।
नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी। ४।
४०. जन्माचे कारण रामनाम पाठे। जाईजें वैकुंठे एक हेळां ।।।
रामनामा ऐसां जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल अपैसा इहलोकीं। २।
दो अक्षरी राम हा जप परम। नलगे तुज नेम नाना पंथ। ३।
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचें चरित्र । उद्धरसि गोत्र पूर्वजेंसी। ४ ।
४१. विषयांचे कोड कां करिसी गोड। होईल तुज जोड इंद्रियबाधा।१।
सर्व हे लटिके जाणुनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे। २।
मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो। परि न धरिसी भावो भजनपंथे। ३ ।
नामा म्हणे देवा करी तूं लवलाहो । मयूराचा टाहो घन गर्जे। ४ ।
४२. कांसवीचे दृष्टी जै होईजे भेटी । तै अमृताची वृष्टि घडे त्यासी। १।
तैसें हे भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय।२।
धन्य त्याचे कुळ सदां पै सुफळ । दिननिशी फळ रामनाम । ३।
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम । ४ ।
४३. सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदि कळिकाळ शास्त्र सांगे। १।
ब्रह्मांडनायक ऐंसे जें कवतुक । तेचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें। २ ।
आदी अंत पाहतां नाही पै सर्वथा। परिपूर्ण सरीता अमृताची। ३ ।
नामा म्हणे अनंत कां करीसी संकेत। उद्धरिले पतीत युगायुगीं। ४ ।
हरीपाठाचे प्रत्येक अभंगानंतर 'न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे। वणिज वक्त्र
श्रीरामनाम' हे धृपद म्हणावे.
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी। १ ।
नारायण नारायण हेचि पारायण । उद्धरले जन इहलोकी । २।
तटती यातना कर्माच्या भावना । जड जीव उद्धरणा नाम स्मरा । ३ ।
नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नानाकोटी। ४ ।
६. तीर्थ तपरासी जप हृषीकेशी। नाम अहर्निशी रामराम । १ ।
तीर्थांचे पै तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामें। २ ।
साधेल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा । ३ ।
नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारी इहलोकी। ४ ।
४६. पाहता ये परिपाठी आणीक नाहीं सृष्टी । नामेविण दृष्टी न दिसे माझे। १ ।
नामचि समर्थ नामचि मथीत । शंकरासी हेत रामनामी। २ ।
पुरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ । ३ ।
नामा म्हणे उच्चार न करी तूं विचार । तुटेल येरझार नाना योनी । ४ ।
४७. तपांचे पै तप राम हे अमुप। करी कां रे जप रामनामी। १ ।
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण। तुटेल बंधन यमपाश। २ ।
साधेल साधन होती कोटी यज्ञ । नाम जनार्दन जप करी। ३ ।
नामा म्हणे जिव्हे नाम स्मरण करी । म्हणे नरहरी एक भावें । ४ ।
४८. हाचि नेम सारी साधेल तो हरी । नाम हे मुरारी अच्युताचें। १।
गोविंद हरे गोविंद हरे । यादव मुरारे रामनाम । २।
न लगती कथा नाना विकलता। राघवाचे स्मरतां नाम वाचे । ३ ।
नामा म्हणे राम आम्हा हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां। ४ ।
४९. करूं हे कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें। १।
जगाचा जनक रामकृष्ण एक। न करितां अविवेक स्मरे राम। २।
तुटेल भवजाळ कां करिसी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रिय बाधा। ३।
नामा म्हणे गोविंद स्मरे तूं सावध। नव्हे तुज बाध नानाविघ्नें। ४ ।
५०. मायेचे भूचर रज तम सात्विक। रामनाम एक सोडवणे।।
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामें घडे यज्ञ कोटी देखा । २॥
न लगती साधन नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगी कां रे।३।
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां । नित्य ते पौर्णिमा सोळा कळी। ४।
५१. माझें मी करिता गेले हे दिवस। न धरीच विश्वास रामनामी।।
अंती तुज उद्धरती रामकृष्ण हरी। राम पंचाक्षरी मंत्रसार। २ ।
कां करशील सांठा प्रपंच विस्तार । न तुटे येरझार नामेंविण। ३।
नामा म्हणे कैंसे रामनामी पिसें। तो उद्धरेल अपैसे इहलोकी। ४ ।
५२. नको नको माया सांडी लवलाह्या । पुढील उपाया झोंबें कां रें।१।
रामनाम म्हणे तुटेल बंधन। भवबंध मोचन एकानामें। २।
स्मरतां पतीत उद्धरले यथार्थ। नाम हाचि स्वार्थ तया झाला । ३ ।
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप। नामें चुकली खेप इये जनीं। ४ ।
५३. स्मरण करितां रामनाम ध्वनी। ऐकतांची कर्णी पळती यम । १।
ऐसें पाठ करी रामकृष्ण हरी । होतील कामारी रिद्धीसिद्धी। २।
साध्य तोचि साधी न करी उपाधि । जन्मांतरीच्या व्याधि हरती नामें। ३ ।
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाही आणिक देव रामेंविण। ४ ।
५४. रामकृष्ण माळ घाली कां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह। १ ।
होशील तूं साधु न पवसी बाध । पूर्ण ब्रह्मानंद पावेल तुज । २ ।
जपतां रामनाम पुरती सर्व काम। आदि अंती नेम साधेल तुज । ३ ।
नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ। न लगती ते अर्थ माया फासें। ४ ।
५५. शरीर संपत्ती मायेचे टवाळ । वायांची पाल्हाळ मिरवितोसी। १।
नाम हेचि तारी विठ्ठल निर्धारी । म्हणे हरी हरी एकी हेळा । २ ।
स्मरतां गोपाळनाम वंदील काळयम । न लगती नेम मंत्रबाधा। ३ ।
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे । ४।
१६. भवाब्धि तारण रामकृष्ण नांव। रोहिणीची माव सकळ दिसे।१।
चि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठी बिढार रामनामें । २ ।
महे निशाणी जपताची अढळ । वैकुंठ तत्काळ तया जीवा। ३ ।
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल। अंती तुज पावेल नाम एक । ४ ।
५७. जळाचा जळबिंदु जळींच तो विरे। तैसें हे विघरे पांचां ठायी। १ ।
जीवशीव हे उच्चार नाम हे मधुर। जिव्हेसी उच्चार रामनाम । २ ।
रामनाम तारक शिव षडाक्षरी । तैसी वाचा करी अरे मूढा । ३ ।
नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम। मंत्र हा परम रामनाम । ४ ।
५८. करितां हरिकथा नाम सुखरासी। उद्धार जीवाशी एका नामें । १ ।
ते हे रामनाम जप तूं सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा। २ ।
नामेंचि तरले नामेंचि तरले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी। ३।
नामा म्हणे एक नामेंसी विनटे । ते वैकुंठीचे पेठे पावले देखा। ४ ।
५९. नामावाचूनि काही दुजें येथें नाहीं। वेगी लवलाही राम जपा।१।
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ। पावसी केवळ निजपद। २ ।
ध्रुव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि विद्गद पावले देखा। ३ ।।
नामा म्हणे राम वाचे जया नाम । संसाराचे श्रम हरे नामें । ४ ।
६०. म्हणतां वाचे नाम वंदी तया यम । काळादिकासम वंदी तया। १।
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ। उच्चारितां नीट वैकुंठ गाजे।२।
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा । न कळे तया उपमा आदिअंती। ३।
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटे। तरी प्रत्यक्ष प्रगटे विठ्ठल हरी। ४ ।
६१. कृष्णनाम श्रेष्ठ गाताती देवऋषि । नाम अहर्निशी गोपाळाचे।१।
हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरी । वसे चराचरी जनार्दन । २।
आदि ब्रह्म हरी आळवी त्रिपुरारि। उमेप्रती करी उपदेश।३।।
नामा म्हणे पूर्ण हा जप उत्तमोत्तम। शंकरासी नेम दिनदिशीं।४।
६२. कां करितोसी शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज।१।
राम कृष्ण हरी गोविंद गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ। २।
वंदितील यम कळिकाळ सर्वदा। न पवसी आपदा असतां देही। ३ ।
नामा म्हणे वोळगे सीण झाला सांगे। प्रपंच वाउगे टाकी परते। ४ ।
६३. नामाचेनि पाठे जातील वैकुंठे। तो पुंडलिक पेठे प्रगट असे।१।
विठ्ठल विठ्ठल मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाहीं शस्त्र नामेंविण। २।
पुराण व्युप्तत्ति न लगती त्या श्रुती। हरीनाम पंथी मुनि गेले। ३ ।
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें । ४ ।
६४. सर्वांभूती भज नमन करी संता। नित्य त्या अच्युता स्मरण करी। १।
ऐसें भजनी विनट सांपडेल वाट। रामकृष्ण नीट वैकुंठींची। २ ।
न लगती साधने वायांचि बंधनें। एका नामें होणे चतुर्भुज। ३।
नामा म्हणे थोर नामेंचि सधर । वैकुंठी बिढार तया भक्तां । ४ ।
६५. तूं तंव नेणता परी हरि जाणता । आहे तो समता सर्वांभूतीं। १ ।
सर्व ब्रह्म हरी येकचि निर्धारी। होसील झडकरी ब्रह्म तूंचि। २ ।
अच्युत माधव अमृताच्या पाठे। लागतांची वाटे वंदी यम । ३ ।
नामा म्हणे होसील जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता। ४ ।
६६. कां करिसी सोस मायेचाअसोस। नव्हे तुज सौरस नामेंविण। १।
नामचि हा मंत्र नामचि हो तंत्र । नामेंविण पवित्र न होसी देखा। २ ।
तिही लोकी पाहता नामेंविण सर्वथा। अच्युत म्हणता पुण्य कोटी। ३ ।
नामा म्हणे ब्रह्म आदिअंती नेम। तें विटेवरी सम उभे असे। ४ ।
६७. पवित्र परिकर नाम हा उच्चार। उद्धरण साचार जगा यया। १।
गोविंद केशव उच्चार श्रीराम । न लगती नेम अमूप जप । २ ।।
ते हे विठ्ठलरूप पिकलें पंढरी । नाम चराचरी विठ्ठल ऐंसे । ३ ।
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारितां मोल नलगे तुज। ४ ।।
६८. पोसिशी शरीर इंद्रियांचा बांधा । सेखी ते आपदा करील तुज । १ ।
नव्हे तुझे हित विषय पोषिता। हरी हरी म्हणता उद्धरसी। २।
वायांच पाल्हाळ चरित्र सांगसी। परी राम हे न म्हणसी अरे मूढा। ३ ।
नामा म्हणे हेंचि पंढरीये निधान । उच्चारितां जन तरले ऐसे । ४।
६९. विषय खटपट आचार सांगसी। विठ्ठली न भजसी अरे मूढा। १।
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी। अंती हा निर्धारी तारील सत्य। २।
न लगे सायास करणे उपवास । रामाचा विश्वास ऐसा धरी । ३।
नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम। विठ्ठल हाचि नेम दिननिशीं । ४ ।
७०. नव्हे तुज हित विषय पोशितां । हरी हरी म्हणता तरशील । १।
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी। वेगीं हा उच्चारी लवलाही। २।
घडतील यज्ञ पा होतील भग्न । प्रपंच सर्वज्ञ होईल ब्रह्म। ३ ।
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा। उद्धरसी सर्वथा भाक माझी। ४ ।
७१. उपदेश सुगम ऐके रे तूं एक । नाम हे सम्यक विठोबाचे। १ ।
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कली माजी। २ ।
साधेल निधान पुरेल मनोरथ। नामेचि कृतार्थ होती जन। ३ ।
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावसी निर्धारी वैकुंठपद । ४ ।
७२. सर्वांगे साजिरी आहेति इंद्रिये । तंव सावध तूं होय हरिकथे। १।
कीर्तनी नर्तन वाचे जनार्दन । न पवसी पतन येरझारी। २ ।
पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटेल सप्रेमे जीवन हेतूं। ३ ।
नामा म्हणे विलास न करी तूं आणिक । सर्वी सर्व एक नाम असे । ४ ।
७३. सोपा हा सुगम उपावो परीस । धरी तूं विश्वास नाम महिमा। १ ।
नाम हेचि गंगा नाम हेचि भीमा। अंतरी श्रीरामा जपिजेसु। २।
अमृत सुरस राम नाम एक। वाचेचे वाचक मन करीं। ३ ।
नामा म्हणे सुरस एक राम रस । ध्यायीं केशवास दिननिशीं। ४ ।
७४. म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळीं। नित्य वनमाळी भक्ता संगे। ११
होईल साधन विठ्ठली परिपूर्ण। निवती नयन मूर्ति पाहता। २.
शंखचक्रांकित आयुधे शोभती। भाग्योदयीं येती भावशीळा । ३ ।
नामा म्हणें तें रूप पंढरीये आहे । न सोडी तूं सोये केशवाची। ४ ।
७५. रुपाचे रूपस नाम हृषीकेश। पंढरी निवास जप करी।।
विठ्ठल श्रीहरी मुकुंद मुरारी। नामेचि बोहरी प्रपंच्याची। २।
विठ्ठलाचें नाम हेंचि जीवन हेत । नाम हे अमृत केशवाचे । ३ ।
नामा म्हणे देव अमृताचा साठा। मुखामाजी पैठा होत नामें । ४ ।
७६. सार हे पै नाम विठोबाचे आहे । दिननिशीं सोये मना लावी। १।
गुंफिजेल मन जोडिती पाऊलें। तुटे ते घातले मायाजाळ। २।
नामचि कारण जप पैं सुफळ । उद्धार निर्मळ सकळ जीवा। ३।
नामा म्हणे तो हा विठ्ठल पंढरी। नाम चराचरी अमृतमय। ४ ।
७७. विठ्ठल नामी आळस न करी गव्हारा । वायाविण येरझारा शिणतोसी। १।
हरि उच्चारण करी हा विचार । नाम हे साचार उद्धरण। २ ।
मी म्हणता अहंता वाढे हे सर्वथा। हरि भजन पंथा नाही मार्ग। ३ ।
मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा । विठ्ठल नाम पाठा वोळगे जना। ४ ।
सर्वहि लटिके मायाजाळ फिके। रामेवीण एके नाही दुजे । ५।
नामा म्हणे उपदेश भजे केशवास । वैकुंठ निवास वोळे तुज। ६ ।
७८. हरिनाम पाठ हाचि भावो। हरि हरि हाचि देवो।।
हरिविण न फिटे संदेहो। सर्व जीवांचा जाण पां। १ ।
हरि सत्य ज्या देहीं । तोचि तरला येथ पाही।
हरिविण भवडोहीं । तरण कैसें घडेल । २।
रामकृष्ण वासुदेवा। हाचि सर्व जीवांचा विसावा।
ऐसा पुकारुनिया धांवा । विठ्ठल नाम उच्चारी । ३ । नामा जपें हृदयीं सदां । रामकृष्ण हाचि धंदा।
हरिनाम परमानंदा। हाचि जप जपतसें। ४।।
नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई हे भजन करावे.
हरीपाठ अभंग समाप्त.
अप्रतिम ! खूप खूप धन्यवाद !
ReplyDelete