संत नामदेवांचे अभंग गाथा भाग -३
श्री विठ्ठलदर्शन
१७. निर्गुणींचे वैभव आलें भक्तिमिर्षे । तें हे विठ्ठलवे ठसावलें। १ ।
बरविया बरवें पाहता नित्य नवें । हृदयी ध्यातां निवे विविधताप। २।
चोविसांवेगळे सहस्रां आगळे। निर्गुणा निराळे शुद्धबुद्ध। ३ ।
वेदां मौन पडे श्रुतींसी कानडे। वर्णितां कुवाडे पुराणांसी। ४ ।
भावाचे आळुके भुलले भक्तिसुखें । दिधले पुंडलीकें सांधूनियां। ५ ।
नामा म्हणे आम्हां अनाथा लागुनी। निडारले नयनी वाट पाहे । ६ ।
१८. ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरंजन। १ ।
ते आम्ही देखिले चर्मचक्षु दृष्टीं। उभा वाळवंटी पंढरीये। २।
वेदां अगोचर तयां सहस्रमुखा। तें झालें पुंडलिका लोभापर। ३ ।
परतल्या श्रुती म्हणती नेती नेती। आम्हां गातां गीती सापडलें। ४ ।
स्वरुपाचा निर्धार बोलती पुराणें। शिणली दरुशनें वादतीं। ५ ।
नामा म्हणे यांसी भावची कारण । पावावया चरण केशवाचे। ६ ।
१९. विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही बाह्या । १।
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळां । भेटे वेळोवेळां केशिराज। २।
ऐसा दयावंत घेत समाचार। लहान आणि थोर सांभाळितो। ३।
सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायी। ४ ।
नामा म्हणे तया भक्तांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे। ५।

२०. योगीयांचे ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी । १।
दाटगे नागर कटी ठेऊनि कर । सर्वस्वे उदार भक्तालागी। २।
ज्ञानिया सिद्धांती लक्षापरी नये। आमुची वाट पाहे अनाथाची। ३ ।
पुंडलिका भावा वोळले वोरसें । नेणों काय कैसे प्रेम त्याचे। ४ ।
जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय। आमुचे भक्तिप्रिय संसारीका। ५।
नामा म्हणे जीवें करीन ओवाळणी। झणी चक्रपाणि दिठावसी। ६ ।
२१. माझा भाव तुझे चरणी । तुझें रुप माझे मनीं। १।
सांपडलों एकमेका। जन्मोजन्मी नोहे सुटिका। २।
त्वां मज केले रे विदेही। म्यां तुज धरिले हृदयी। ३ ।
त्वां तोडिली माझी माया । मी जडलो तुझ्या पाया। ४ ।
नामा म्हणे गा सुजाणा। सांग ठकिलें कोणकोणा। ५।
२२. जीव विठ्ठल शिव विठ्ठल। आत्मा विठ्ठल अखंडीत । १।
जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती। २ ।
अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल। निरंतर विठ्ठल तारिता। ३ ।
नाम विठ्ठल रुप विठ्ठल। पतित पावन विठ्ठल विठ्ठल नामा। ४ ।
२३. विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो।
तुटला हा संदेहो । भवमूळव्याधीचा ।१।
म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरि श्रीधर ।
हेचि नाम आम्हां सार । संसार तरावया। २ ।
एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हा हरिपर्वणी।
जें गाइजे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ।३।
नेघों नामाविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही।
नामा म्हणे तरलों पाहीं। विठ्ठल विठ्ठल म्हणताचि। ४ ।
२४. विसांवा विठ्ठल सुखाची साउली। प्रेमपान्हा घाली भक्तांवरी। १ ।
दाखवी चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण नारायणा। २ ।
विठ्ठल आचार विठ्ठल विचार । दावी निरंतर पाय आतां। ३ ।
नामा म्हणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरी हातीं मज। ४ ।
२५. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल। १ ।
माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल । २ ।
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल। निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल। ३ ।
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणोनि कळिकाळां पाड नाहीं। ४ ।
२६. जय विठ्ठल श्री विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल । १ ।
परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल। निरंजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। २ ।
जोचि नाम तोचि देवो । ऐसें म्हणों तरी नाहीं संदेहो । ३ ।
म्हणे विष्णुदास नामा । तो नेईल परमधामा। ४ ।
Comments
Post a Comment