Posts

Showing posts from June, 2019

संत नामदेवांचे अभंग गाथा भाग -३

श्री विठ्ठलदर्शन १७. निर्गुणींचे वैभव आलें भक्तिमिर्षे । तें हे विठ्ठलवे ठसावलें। १ । बरविया बरवें पाहता नित्य नवें । हृदयी ध्यातां निवे विविधताप। २। चोविसांवेगळे सहस्रां आगळे। निर्गुणा निराळे शुद्धबुद्ध। ३ । वेदां मौन पडे श्रुतींसी कानडे। वर्णितां कुवाडे पुराणांसी। ४ । भावाचे आळुके भुलले भक्तिसुखें । दिधले पुंडलीकें सांधूनियां। ५ । नामा म्हणे आम्हां अनाथा लागुनी। निडारले नयनी वाट पाहे । ६ । १८. ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरंजन। १ । ते आम्ही देखिले चर्मचक्षु दृष्टीं। उभा वाळवंटी पंढरीये। २। वेदां अगोचर तयां सहस्रमुखा। तें झालें पुंडलिका लोभापर। ३ । परतल्या श्रुती म्हणती नेती नेती। आम्हां गातां गीती सापडलें। ४ । स्वरुपाचा निर्धार बोलती पुराणें। शिणली दरुशनें वादतीं। ५ । नामा म्हणे यांसी भावची कारण । पावावया चरण केशवाचे। ६ । १९. विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही बाह्या । १। गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळां । भेटे वेळोवेळां केशिराज। २। ऐसा दयावंत घेत समाचार। लहान आणि थोर सांभाळितो। ३। सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायी। ४ । ...

संत नामदेवांची अभंगगाथा -2 ‌‌

संत नामदेवांची अभंगगाथा -2 ‌‌                                                        ‌‌‌‌‌            चर णवंदन ‌‌‌‌                ‌                ‌‌‌      ६.दीनाची माऊली। आजि म्यां देखियेली। १।  कटी ठेउनियां कर । उभी राहे विटेवर । २। मुगुट रत्नांचा साजिरा । वरी मोतियांचा तुरा । ३। रुप लावण्य गोजिरें। हृदयी पदक साजिरें । ४ । कासे पिवळा पीतांबर। चरणी ब्रिदाचा तोडर । ५ । भक्ता कृपेची साउली। नामा वंदी पायधुळी। ६। ७. विटेवरी समचरण सुंदर। बाळ सुकुमार यशोदेचें। १ । वाळे वांकी गर्जे तोडर चरणी । नाद झणझणी वाजताती। २ । कांसे कसियेला पीत पीतांबर । लोपे दिनकर तेणें प्रभा । ३ । नामा म्हणे नाही तुझ्या रूपा पार। तेथें मी किंकर काय वानूं । ४ । ८. समचरणी उभा कैवल्याचा गाभा। देत असे शोभा पीतांबर।। चर...

संत नामदेवांची अभंगगाथा - 1

Image
संत नामदेवांची अभंगगाथा              ‌‌‌          मंगलाचरण  १.प्रथम नमन करूं गणनाथा। उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आतां दंडवत । १ ।  दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा। वाकसिद्धि पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत । २ । आतां वंदूं देव ब्राह्मण । ज्यांचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनी श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत । ३ । आतां वंदूं साधु सज्जन । रात्रंदिवस हरीचें ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझें नमन दंडवत । ४ । आतां नमूं रंगभूमिका । कीर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत । ५ । ऐसें नमन करोनि सकळां । हरीकथा बोले बोबड्या बोला । अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळां नामा म्हणे। ६ । २. प्रथम नमूं गजवदनु । गौरीहराचा नंदनु । सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनू नमियेला । १ । त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ती । एके बाणें त्रिपुर पाडिला क्षितीं । तै पशुपति संतोषला । २ । इंद्रादिकी अष्टलोकपाळीं । लंबोदर...